Monday, March 15, 2010

`` आठवण ``

येईल माझी आठवण तेँव्हा
भिँतीवरील आरसा पाहशील का ?
हळुच त्यावर हात फिरवुनी
डोळ्यात पाणी आणशील का ?


येईल माझी आठवण तेँव्हा
दुरुन हाक देशील का ?
मला जवळ बोलवुनी
हातात हात देशील का ?


येईल माझी आठवण तेँव्हा
दारावरती बसशील का ?
रस्तयावरुन मी जातांना
नेहमी सारखी पाहशील का ?


येईल माझी आठवण तेँव्हा
गेल्या काळात जाशील का ?
रोज रोजची बोलणी अन्
गेलेले दिवस आठवशील का ?


येईल माझी आठवण तेँव्हा
प्रेम असेच साठवशील का ?
कसा जगणार तुझ्यावाचुनी
थोडा माझा विचार करशील का ?

थोडा माझा विचार करशील का ?

frm - यशोदिप

No comments:

Post a Comment