Sunday, March 14, 2010

♥♥ कारण मी त्याच्या वर प्रेम करते ♥♥

मी त्याला काहीच बोलत नाही
सगळ काही त्याच ऐकते
स्वतःच्याच मनाविरुध्द वागते
कारण मी त्याच्या वर प्रेम करते ॥


माझच मन नेहमी मारते
त्याच्याच मनासारखं वागते
आठवण आली की रडत बसते
कारण मी त्याच्या वर प्रेम करते ॥


तो नेहमीच हसरा असावा
म्हणून मी प्रयत्न करते
मी रडते पण त्याला हसवते
कारण मी त्याच्या वर प्रेम करते ॥


त्याला आवडत नाही म्हणून
स्वतःच्या सवयीँना बदलले
त्याच्यासाठी जगला सहन केले
कारण मी त्याच्या वर प्रेम करते ॥


त्याच्या शिव्या ऐकून घेते
राग आला तरी गप्प बसते
त्याचा सगळा अन्याय सहन करते
कारण मी त्याच्या वर प्रेम करते ॥


तो फक्त माझा असावा म्हणून
त्याच्यात सार जग पाहते
त्याच्याच मिठीत जावून रडत बसते

कारण मी त्याच्या वर प्रेम करते ॥

कारण मी त्याच्या वर प्रेम करते ॥

No comments:

Post a Comment