कितीही सुंदर मुलगी दिसली तरी
तिची स्तुती करुन तिला
हरबर्रया च्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणून आम्हाला `प्रेम` करायला अजून जमलेच नाही ॥
कोणाच्या मागे शिट्ट्या मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणून आम्हाला `प्रेम` करायला अजून जमलेच नाही ॥
कोणी जर आवडलीच तर
स्वतःहून गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणून आम्हाला `प्रेम` करायला अजून जमलेच नाही ॥
दुसरयांचे विचार ऐकत असताना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणून आम्हाला `प्रेम` करायला अजून जमलेच नाही ॥
फुलपाखराप्रमाणे आम्हीही
बरयाच सुंदर फुलांमध्ये वावरत आहोत
पण जाऊन बसण्यासारखे फुल आम्हाला अजून दिसलेच नाही
म्हणून आम्हाला `प्रेम` करायला अजून जमलेच नाही ॥
म्हणून आम्हाला `प्रेम` करायला अजून जमलेच नाही ॥
No comments:
Post a Comment