Tuesday, March 16, 2010

" नुतन वर्षाच्या तुम्हास हार्दिक शुभेच्छा "

गुढी पाडवा...
तसाच दिवस
पुन्हा तसेच वर्ष
तरी मनास होतो
आज नवा हर्ष

उभारुन गुढी
करु दुख:चा व्यय
नव्या वर्षाला
नव्या सुखाचे ध्येय

जुन्या नव्या मित्रांची
लाभेल संगत
श्रीखंड पुरीची
आज रंगेल पंगत

मोठ्यांचा आशिर्वाद
लहानांचा जिव्हाळा
आपल्याच माणसांचा
हा आपलाच सोहळा

वाहतील चोहीकडे
आनंदाचे वारे
लाभो तुम्हास
सुख समाधान सारे

नव्या वर्षात होवो
पूर्ण सा-या इच्छा
नुतन वर्षाच्या तुम्हास
हार्दिक शुभेच्छा...!!

No comments:

Post a Comment