Monday, March 15, 2010

' प्रेम ' म्हणजे !!

' प्रेम ' म्हणजे मानवी मनातील
उदात्त भावना असते
उत्कट भावनांचा तितकाच उत्स्फूर्त अविष्कार
म्हणजे ' प्रेम '

आपल्या रंध्रातून खोलवर पाझरत जाणारा नाद
म्हणजे ' प्रेम '

आपल्या प्राणात भरुन उरलेला कुणाचा तरी श्वास
म्हणजे ' प्रेम '

चातकासारखी अनिवार ओढीची आस
म्हणजे ' प्रेम '

" नसलेले भास " आणि " असलेले आभास "
म्हणजे ' प्रेम '

निःस्वार्थ अंतःकरणाने दुसऱ्‍याच्या अंतकरणाचा
ताबा मिळविण्याचा केलाला प्रयत्न
म्हणजे ' प्रेम '

ह्रदयाच्या रम्य मंदिरात भावनेच्या वेलीवर
सतत फुलत राहणारा अडीच अक्षरी शब्द

म्हणजे ' प्रेम '

by
धनश्री जोशी

No comments:

Post a Comment