मी तुझाच होतो
सांज ढळली होती ,
रात नटली होती
नभातही चांदतारे
पण मी एकटाच होतो
पण तरी मी तुझाच होतो
त्या वळणावरती तू वाट वेगळी केली
सोडून तू दूर-दूर गेली
पाहिलेस ना वळून एकदाही
उभा मी त्याच वळणावर होतो
अजूनही मी तुझाच होतो
जगापासून मी दूर झालो
एका काळोखात मी चुर झालो
हो ! हो मी नशेत होतो
परी ही नशा तुझीच होती
अन मी ही तुझाच होतो
जगण्याचा शाप सोसू कसा ?
रोज रोज मी मरू कसा ?
अखेरच्या क्षणी माझ्याशीच रडून घेतले मी
मलाच जेव्हा मी सोडून चाललो होतो
तेव्हा ही मी तुझाच होतो
मी तुझाच होतो !!
- Rupesh Kadam -
No comments:
Post a Comment