Saturday, July 3, 2010

" शकिराचे 'BOLLYWOOD' कनेक्शन ! "

Bollywood फ्रेश मध्ये चक्क शकिराचा फोटो पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसला असेल.
शकिराचे Bollywood फ्रेशमध्ये काय काम असाही प्रश्न पडला असेल.
पण, मंडळी शकिराचे 'Bollywood' कनेक्शन नुकतेच उघडकीस आले आहे.
त्याचं काय आहे की, शकिरा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्टार. तिच्या र्नत्य-गाण्यावर फिदा असणार्रयांची संख्या जगात कमी नाही.
तसे तर शकिराने भारतातील काही प्रमुख शहारांमध्ये आपली कला कार्यक्रमांत सादर केली आहे.
पण आतापर्यंत Bollywood मध्ये ती झळकली नव्हती. पण आता काळ बदलला आहे. आधी मुख्य भारतीय नट्यांबरोबर नाचणार्या टोळीत पाशचात्य न्रत्यांगणांचा समावेश झाला.
नंतर हळूहळू मुख्य भूमिकांतही या परदेशी नट्या चमकू लागल्या. 'ब्ल्यू', 'काईट' यांसारख्या चित्रपटांतून आपण ते पाहिलेच आहे.

या पाशर्वभूमीवर सचिन जोशी यांच्या चित्रपट शकिरा पार्श्र्वगायन करणार आहे म्हणे.
संगीतकार आहेत ॰सलीम-सुलेमान॰.
म्हणजे कमीत कमी शकिराच्या आवाजाची तरी Bollywood मध्ये एंट्री झाली म्हणायची.
आता सुंदर गाणे तुम्हीच हिट करा म्हणजे कदाचित शकिराला एखाद्या भूमिकेत पाहण्याची संधीही तुम्हाला मिळेल..

No comments:

Post a Comment